Sunday, May 26, 2019

निकालाची तारीख
Board exam 2019 result date =
H.S.C.
*27/5/2019*                 
 S.S.C.
*6/6/2019*

ही तारीख पुढील ग्रुपमध्ये पाठवा. त्यामुळे आपल्या मित्रांना याची माहिती होईल.

*पालकांना महत्वाची सुचना*

ज्या विद्यार्थांनी १० वी व १२ वी ची परीक्षा दिलेली आहे....

११ वी व पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र...

🇮🇳 *उत्पन्न दाखला* 🇮🇳
१_तलाठी उत्पन्न दाखला
२_रेशन कार्ड
३_आधार कार्ड

🇮🇳 *डोमिसाईल* 🇮🇳
१_तलाठी रहिवासी दाखला
२_शाळा सोडल्याचा दाखला
      किंवा बोनाफाईड
3_रेशन कार्ड
४_आधार कार्ड

🇮🇳 *जातीचा दाखला* 🇮🇳
१_मुलाचा शाळा सो. दाखला
२_वडिलांचा शाळा सो.दाखला
३_आजोबा शाळा सो. दाखला
४_तलाठी रहिवासी दाखला
५_रेशन कार्ड
६_आधार कार्ड

(एसी/एस टि- १९५०, व्हिजे / एन टि-१९६१, ओबीसी- १९६७ चे मानवी दिनांक पुरावे आवश्यक)

🇮🇳 *नॉन क्रिमिलेअर* 🇮🇳
1_तलाठी मागील ३ वर्षाचे उत्पन्न दाखले
२_तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
३ _शाळा सो. दाखला
४_वडिलांचा शाळा सो. दाखला
५_जातीचा दाखला (प्रांत सो)
६_तलाठी रहिवासी दाखला
७_रेशन कार्ड
८_आधार कार्ड

पालकांची जुनमध्ये धावपळ होते व कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागते...

अम्रुत धन

        *‼‼‼‼अम्रुत धन‼‼‼‼*


  •        देवाने तर पहिलेच सांगुन ठेवले आहे. माझ्याकडे मागून मिळालं असतं*
  •               तर, भिकाऱ्याला "भिक" आणि*
  •          शेतकऱ्याला "पीक"*
  •          कधीच कमी पडू दिलं नसतं.*
  •        त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे..!*
  •        फक्त निवडलेला "रस्ता" जर "इमानदारीचा" व सुंदर विचाराने मंतरलेला असेल*
  •         तर,"थकुन" जाण्याचा प्रश्नच "उरत" नाही.*
  •        भले "सोबत" कुणी असो वा नसो..!*
  •        पण...मनापासून कुठलही काम करण्यापूर्वी, आपल्या चांगल्या कर्माची आठवण काढा,प्रत्येक्षात                 परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल...!*

          

पंतप्रधान मोदीजी स्वतःविषयी

माननीय पंतप्रधान मोदीजी स्वतःविषयी लिहीतात..

माझ्या लहानपणी आमचे आठ जणांचे कुटुंब ४०x१२ फुटांच्या घरात रहात असे. हे घर लहानच होते, परंतू ते गैरसोयीचे आहे असे आम्हाला कधीच वाटले नाही. आमचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होत असे, कारण त्यावेळी माझी आई लहान मुलांवर पारंपारिक उपचार करीत असे. त्यासाठी रात्री आळीपाळीने उठून आम्ही आईची चूल धुमसती ठेवत असू. शालेय शिक्षण घेण्याचे भाग्य तिच्या नशिबी नव्हते, पण ईश्वरकृपेने आजारी मुलांना बरे करण्याचा तिचा हातगुण असा विलक्षण होता की, आजारी मुलांना घेऊन आलेल्या आया बायांची रांग आमच्या घरापुढे रोज सकाळी लागत असे.

सकाळची ही गडबड संपल्यावर मी रेल्वे स्थानकावरील माझ्या वडिलांच्या चहाच्या दुकानाकडे धाव घेत असे. दुकान उघडून, साफ सफाई करून मी तसाच परस्पर शाळेत जात असे. शाळा सुटल्यावरही मी वडीलांना मदत करण्यासाठी तेथे जात असे. परंतु तेव्हा मात्र देशभरातून आलेल्या प्रवाशांच्या सहवासाचे आकर्षण जास्त असे. त्यांना चहा देता देता मी त्यांचे संभाषण ऐकत असे. त्यांच्या गप्पा ऐकून मी हिंदी भाषा बोलण्यास शिकलो. काही व्यापारी मुंबई शहराविषयी बोलत असत. आपणास ही स्वप्ननगरी कधी पहावयास मिळेल काय, असा विचार माझ्या मनात येत असे.

विद्यार्थीदशेतील चौकसबुद्धीला अनुसरून आमच्या शाळेच्या ग्रंथालयात जे जे काही हाती लागेल ते मी वाचत असे. वयाच्या ८व्या वर्षी मी सर्वप्रथम संघाच्या बैठकीस उपस्थित राहिलो. आपले जीवन हे आपल्या स्वतःसाठी नसून इतरांच्या भल्यासाठी आहे, हा पाठ मला तेथे मिळाला व पुढच्याच, म्हणजे ९व्या वर्षी गुजरात पूरग्रस्तांसाठी एक मदत केंद्र व अन्न वाटप केंद्र आम्ही मित्रांनी चालू केले. हे सर्व करण्यासाठीची संसाधने तुटपुंजी असल्याने इच्छा असूनही हे काम मी पुढे करू शकलो नाही.

ईश्वराने आपणा सर्वांना जगण्याचा एकसारखा हक्क बहाल केला आहे, अशी माझी धारणा त्या वयातही होती. मी कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे, सभोवतालची परिस्थिती काय आहे, याचा विचार न करता मला या सर्वातूनच मार्ग काढून मोठे व्हायचे आहे हा ध्यास मनात होता. आमच्या कुटुंबाची परिस्थिती अतीसामान्य होती, चैन काय असते हे मला ठाऊकच नव्हते व चांगले आयुष्य म्हणजे काय असते, हे ही मी कधीच पाहिले नव्हते. पण तरी त्यावेळच्या माझ्या त्या छोट्या जगातील आयुष्यात मी समाधानी होतो. जीवनात संघर्ष होता, पण त्या संघर्षाची जाणीव मात्र त्या वयात नव्हती.

परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्यावर मात कशी करायची याचे मार्ग मी शोधले होते. आपण नीटनेटके व व्यवस्थित असण्यास हवे, ही भावना त्याही परिस्थितीत मनात होती. इस्त्री घेणे परवडण्यासारखे नव्हते. मग एका तांब्यात चुलीतील निखारे घालून त्याला फडके गुंडाळून गणवेश व इतर कपडे इस्त्री करण्याचे तंत्र मी आत्मसात केले. या देशी इस्त्रीने कपडे तितकेच नीटनेटके दिसत असतील तर तक्रार का करायची व परिस्थितीला दोष का द्यायचा ?

मी आज जो काही आहे, त्याची बीजे माझ्या त्या बालपणातील प्रतिकूल परिस्थितीत आहेत. ही जाणीव अर्थातच त्या वेळी मनात नव्हती, कारण ते वयच असे असते की, सुखे व दुःखे चटकन विसरली जावीत ! चहाच्या दुकानात वडिलांना मदत करत, प्रवाशांना चहा विकण्याचे काम करणाऱ्या नरेंद्र मोदी या ८ वर्षाच्या मुलाला कोणी विचारले असते की, भारताचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न तुझ्या मनात आहे का, तर त्याचे उत्तर नक्कीच नाही असेच आले असते. तसा विचार करणेही दुरापास्त होते.

त्या वाढत्या वयात माझ्या मनात अमाप कुतुहूल होते, पण विचारांची दिशा स्पष्ट नव्हती. गणवेशातील सैनिक पाहून देशसेवा करण्याचा हा एकमेव मार्ग आहे असे मला वाटत असे. रेल्वे स्थानकावर साधुसंतांशी माझे बोलणे जसे वाढत गेले, तसे त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन व त्यांची जीवनपद्धती याविषयी उत्सुकता वाढत गेली.

अशीच काही वर्षे गेली. योग्य मार्गदर्शनाअभावी त्यावेळचे माझे जीवन दिशाही, संभ्रमित होते. मला काहीतरी करायचे आहे, पण  काय करायचे आहे व ते का करायचे आहे, त्यासाठी मला कोठे जायचे आहे, हे माहित नव्हते. अशा मनःस्थितीत मी परमेश्वराला शरण गेलो व वयाच्या १७व्या वर्षी आई वडीलांचा आशीर्वाद घेऊन मी हिमालयाचा रस्ता धरला.

दैवावर भरवंसा ठेऊन मी हिमालयात भटकंती केली. या भटकंतीतून काही प्राप्त करण्याचे माझ्या मनात नव्हते, पण तरीही माझ्या मनातील बऱ्याच शंकाकुशंकांची उत्तरे मला मिळाली. मला या जगाचा व माझ्या स्वतःचा शोध घेता आला. हिमालयात मी खूप प्रवास केला, रामकृष्ण मिशन मध्ये काही काळ व्यतीत केला. साधू संतांच्या सानिध्यात राहून अंतर्मनाचा शोध घेतला. विविध स्थळांना भेटी दिल्या.

या दरम्यान मी ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे ३ ते ३.४५ च्या दरम्यान जागा होत असे व हिमालयातील रक्त गोठविणाऱ्या गार पाण्याने स्नान करत असे. खळाळणाऱ्या एखाद्या धबधब्याच्या आवाजात ध्यानाद्वारे शांतता व ऐक्यभाव याची अनुभूती घेण्यास मी शिकलो. ज्या साधूंच्या सानिध्यात मी राहिलो, त्यांनी मला या विश्वाशी एकतानता कशी साधावी याचे शिक्षण दिले.

मला पुढच्या आयुष्यात ही विलक्षण एकतानता आजवर सहाय्यभूत झाली आहे. मला एक जाणवले की, आपल्या विचारांना काही मर्यादा आहेत. मनात शरणागतीचा भाव ठेऊन तुम्ही जेव्हा अनंतासमोर जाता, तेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही या अथांग विश्वाचा एक भाग आहात. ही जाणीव झाल्यावर तुमच्या मनातील अहंकार गळून पडतो व तुमच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरवात होते.
त्या दरम्यान माझ्यात हे संक्रमण झाले. दोन वर्षांनंतर मनाची सुस्पष्टता व मार्गदर्शक उर्जा मनात घेऊन मी घरी परतलो.

हिमालयातून परत आल्यावर आपले उर्वरीत जीवन हे जनसेवेसाठी आहे हे मला उमगले. परत आल्यावर मी लगेच अहमदाबादला गेलो. मोठ्या शहरात रहाण्याचा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग होता – तेथे जीवनाची गती विलक्षणच होती. मी माझ्या काकांना त्यांच्या उपहारगृहात मदतनीस म्हणून तेथे कामास सुरवात केली.

त्यानंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ प्रचारक झालो. तेथे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटण्याची व विविध प्रकारची कामे करण्याची संधी मला मिळाली. संघाच्या शाखेच्या कार्यालयाची साफसफाई करणे, स्वयंसेवकांसाठी चहा करणे, अन्न शिजविणे आणि भांडी साफ करणे अशी कामे आम्ही स्वयंसेवक आळीपाळीने करत असू.

तेथील जीवनक्रम खूपच दगदगीचा व व्यस्त होता. तरीही त्या तशा धावपळीत हिमालयातील माझ्या वास्तव्याने मला जी शिकवण दिली होती ती मी विसरलो नाही. तेथील वास्तव्यात मला मनःशांतीची जी अनुभूती आली होती, ती या नव्या जीवनक्रमात हरवून जाऊ नये यासाठी दरवर्षी काही काळ अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याचे मी ठरविले. संतुलीत जीवन जगण्याचा तो एक मार्ग आहे असे मला जाणवले.

फार कमी लोकांना हे माहित आहे की दरवर्षी दिवाळीच्या पाच दिवसात मी सर्वापासून दूर, जंगलात जात असे व तेथील निर्मनुष्य परिसर, स्वच्छ पाणी अनुभवत असे. पाच दिवस पुरेल इतकी शिदोरी मी बरोबर घेत असे. तेथे आकाशवाणी किंवा रेडीयो नसे, वृत्तपत्र नसे. दूरदर्शन व इंटरनेट तर नव्हतेच. या वनवासातील आत्मचिंतनातून मला जी उर्जा मिळाली आहे ती आजवर मला माझ्या जीवनकलहात उपयोगी पडली आहे. तेव्हा अनेक लोक मला विचारत – तू तिथे जाऊन कोणाला भेटतोस ? काय करतोस ? मी उत्तर देत असे – मी तिथे मला स्वतःलाच भेटण्यास जातो !

म्हणून मी सर्वांना, विशेषतः माझ्या तरुण मित्रांना नेहमी सांगतो की, तुमच्या व्यस्त दिनक्रमातून व धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून जरा आत्मपरीक्षण करा. त्याने तुमचा दृष्टीकोन सकारात्मक होऊन तुम्हालाच तुमची नवी ओळख होईल. तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगू लागाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल व लोकांच्या बऱ्यावाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला शक्य होईल. या सर्वाचा तुम्हाला पुढील आयुष्यात उपयोग होईल. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्यामध्ये काही वेगळेपण असून आपण स्वयंप्रकाशी आहोत, त्यासाठी आपल्याला बाहेर पहाण्याची गरज नाही !!!

आता इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट्स*

आता इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट्स


प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक वाहनांना आता हिरवी नंबरप्लेट बसविण्यात येणार

💁‍♂ भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी, केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट बसविण्यात येणार असून, या वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाणार आहे. याबाबतचे आदेश केंद्राकडून राज्य सरकारला देण्यात आले आहे.

🎯 *देशात पाच प्रकारच्या नंबरप्लेट* :

▪खासगी वाहने - पांढरी नंबरप्लेट
▪टॅक्सी - पिवळी नंबरप्लेट
▪स्वतः चालक असलेल्या भाड्याच्या वाहनांसाठी - काळी नंबरप्लेट
▪सरकारी अधिकाऱ्यांची वाहने - निळी नंबरप्लेट
▪टेस्ट ड्राईव्हसाठी वापरल्या जाणाऱ्या कार - लाल नंबरप्लेट

📍 हिरव्या रंगाच्या या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगाने वाहन क्रमांक टाकण्यात येणार आहे. 

हवामान बदलाचे परिणाम

🙏भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल


🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.
🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳


एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.
🌳आता नाही तर कधीच नाही.
🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.
।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।
🌳
एक किंवा दोन झाडे लावा आणि " निसर्ग मित्र व्हा "
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🌱🌱  🍀☘🍃🌿🌳🌳🌳🌳

पंढरपूर ला कधी भविष्यात दर्शनला आलात तर

पंढरपूर ला कधी भविष्यात दर्शनला आलात तर इकडे तिकडे ना फिरता थेट श्री. विठ्ठल रुक्मिणी समितीच्या नव्याने बांधलेले भक्त निवास गाठा ( मंदिरा पासून अगदी ०.५ किमी अंतरावर आहे ) कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सोयी भक्तांना मंदिर समिती मार्फत पुरवल्या जातात. तरी सर्व फेसबुक मित्रांना विनंती कि हे पेज जास्तीत जास्त शेयर करावे भक्त निवास संपर्क :- ०२१८६-२२८८८८


Tuesday, May 14, 2019

केवळ मोदी पुन्हा येऊ नयेत

                                                 
पाकिस्तान हा देश जन्माला आल्यापासून आजवर एकदाही भारताशी युद्धात जिंकू शकलेला नाही. हे त्यांनाही माहिती आहे. पण त्याचा जन्मच मुळी भारतद्वेषा पोटी झालेला असल्याने तो कुरापती काढणं कधीच थांबवणार नाही. पाकिस्तान तर्फे आलेले शांतता प्रस्ताव हे केवळ 'टाईम प्लीज' असतात, हा इतिहास आहे. त्यामुळे पुलवामात जे घडलं, ते पुन्हा कधीतरी, कुठेतरी घडवण्यासाठी पाक प्रयत्न करेलच, हे नक्की.
या आधी जेव्हा जेव्हा भारताला युध्दाला वा सदृश परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, तेव्हाचं आणि आताचं वातावरण खूप वेगळं आहे. तेव्हा युद्धकाळात पंतप्रधान पदाचा मान विरोधीपक्षही ठेवत होता. बापट, कुसुमाग्रज, गदिमा यांसारखे कवि सैनिकांचे मनोबल वाढवणाऱ्या, नागरिकांना त्यांच्याशी जोडणाऱ्या कविता करत होते. मीडियाकडे तेव्हा आतासारखी राक्षसी ताकद नव्हती. घरभेदे, देशहितशत्रू तेव्हाही असतील; पण त्यांना फारसा आवाज नव्हता.. मान तर अजिबातच नव्हता.
आजच्या काळात दुर्दैवाने याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. आता बाहेरच्या शत्रूपेक्षा हे अस्तनीतले निखारे जास्त धोकादायक झालेत. अनेक कारणांनी मीडियाने त्यांना उचलून धरलंय. उघडपणे देशाविरोधात बोलूनही त्यांना मान मिळतोय. *'मोदी' या एका माणसाच्या द्वेषापायी ठार आंधळे झालेले हे नतद्रष्ट आपल्याच घराला कमकुवत करताहेत.* अगदी नावानिशी बघा - राज ठाकरे, आव्हाड, ओवेसी यांसारखे नेते; राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, प्रसन्न जोशी सारखे वाहिनीवाले; गिरीश कुबेर,संजय राऊत सारखे संपादक; मुग्धा कर्णिक, कोकाटे, विश्वंभर चौधरी सारखे लेखक... यांनी आपला मोदीद्वेष इतका पराकोटीला नेलाय की त्यांची मोदींना हरवण्यासाठी पाकिस्तानची तळी उचलायचीही तयारी आहे. यांच्या पोस्टस् बघा एकदा...
*पुलवामात ४४ जवान हुतात्मे झाले. याचं दु:ख होण्याऐवजी ही कर्णिकबाई बेशरमपणे मोदींना विचारते- " हाऊ ईज द जोश मोदीजीऽऽ?" आणि नंतर बालाकोट बदल्यानंतर हीच लिहिते- " देशाचे हवाईदल ही कोणा नटेन्द्राची किंवा त्याने पाळलेल्या श्वापदांची सेना नाही.." तो विश्वंभर चौधरी सांगतो.. 'घटना पुन्हा वाचली. सैन्यदलांचे प्रमुख राष्ट्रपती असतात. पंतप्रधान नव्हे!' हो ना ? मग " हाऊ ईज द जोश?" हा प्रश्नही राष्ट्रपतींना किंवा सैन्यप्रमुखांनाच विचारायचा होता. तेव्हा मोदीच कसे आठवतात?*
आज विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात अडकलेत. याचा तर या नतद्रष्ट कंपूला आनंद झालाय असं दिसतंय. कारण मोदींचं नाक कापलं जाईल ही आशा आहे ! म्हणजे ती जबाबदारी पुन्हा मोदींची! इथे विश्वंभर चौधरीने वाचलेली घटना काय म्हणते? आणि १९७१ च्या युद्धात मिळालेला विजय आजतागायत 'दुर्गा' इंदिरा गांधींच्या खात्यात जमा आहे. तेव्हा याची घटना कुठे जाते? भंपक लेकाचे ....
हा दुतोंडीपणा यांनी सोयीनुसार जोपासला आहे. तो 'ॲक्सिडेंटल' नाही. सामान्य नागरिकाचा बुद्धिभेद करणे हा त्यांचा मूळ उद्देश आहे. पाकिस्तानशी युद्ध होईल का? त्याचे परिणाम काय होतील? या प्रश्नांमधे या घरभेद्यांना अजिबात रस नाही. या घटनांचा मोदींना फायदा झाला तर काय करायचं, एवढीच चिंता त्यांना सतावतेय.
१९७१ मधे इंदिरा गांधींना मिळालेलं श्रेय अजूनही सुखाने उपभोगणारे काँग्रेसी बगलबच्चे आता खडबडून जागे झालेत. आता त्यांना साक्षात्कार होतोय की सैन्याच्या विजयात पंतप्रधानांचा काही संबंध नसतो.
इकडे काही निवृत्त वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं, की २६/११ च्या नरसंहारा नंतर, संसदेवरील हल्ल्यानंतर अशीच थेट कारवाई करण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. पण ती तेव्हाच्या पंतप्रधानांनी दिली नाही. (तेव्हा विश्वंभर बहुदा अज्ञात होते. म्हणून पंतप्रधांनाकडे संमती मागितली... घटना वाचत नाहीत सेनेचे अधिकारी!)
आज सामान्य माणूस उघडपणे या बदल्याचं श्रेय पंतप्रधानांना देतोय. ते बघून यांना मळमळायला लागलंय. एरव्ही आपणही हा विषय राजकारणा पलिकडेच ठेवला असता. पण आता नाही. केवळ मोदी पुन्हा येऊ नयेत म्हणून यांचा आटापिटा चाललाय ना? मग आता मोदीच पुन्हा आले पाहिजे... आपण आणू!
एखादा अभिनंदन अडकेल याचा विचार न करता हवाई हल्ला केल्याचे हे परिणाम आहेत, असं हे हरामखोर आता म्हणताहेत. आज एका सैनिकाच्या सुरक्षेचा इतका पुळका येतोय? मग वर्षानुवर्षे असे अनेक सैनिक इथे, काश्मीरमधे फुटिरतावाद्यांच्या दगडफेकीत जखमी होतात; त्यांची कधी काळजी वाटली नाही या नालायकांना?
*मोदी या विजयाचं राजकारण करताहेत? बरं करू देत. चालेल आम्हाला. ते निदान पाकड्यांना मारून, आपल्या सैन्याच्या पाठीशी राहून राजकारण करतात. तुम्ही तर मोदीद्वेषापोटी आपल्याच सैनिकांच्या शौर्याचे आणि हौतात्म्याचे पुरावे मागून पाकिस्तानपेक्षा गलिच्छ राजकारण करताय.*
तुमच्या नादी आम्ही लागू असं वाटतं तुम्हाला? अरे हाट्..... कधीच नाही!
हाऊ इज द जोश? .... इन् मेजॉरिटी, सर !

जय हिंद..

*संकष्ट चतुर्थीची कथा*


                                                            *संकष्ट चतुर्थीची कथा*

फार पूर्वी यादवकुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून
सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी
तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा.

सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु स्त्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला.

पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारुन तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला.

इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला.

ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला. प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय? एके ठिकाणी प्रसेन मरुन पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला.

अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.

श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात, द्वारकेत सगळीकडे आनंदीआनंद झाला.

श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.

श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली.

दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.

*देव अनुभवावा लागतो*

*देव अनुभवावा लागतो*
काही गोष्टीच अशा असतात की जाऊ म्हणतासुध्दा मनातून जाता जात नाहीत. ही पण अशीच गोष्ट.

हे घडलंय एक प्रसिध्द शल्य विशारद डाॅ शैलेश मेहता यांच्या बाबतीत. * *वर्ल्ड फेमस काॅर्डिऑलाॅजिस्ट.* अहमदाबाद, राजकोट,बडोदा इथे सुसज्ज हाॅस्पटले हाताखाली अनेक डॉक्टर्स,स्टाफ. केवळ
 अपाॅईंटमेंट साठी दीड दोन महिने आधी फोन करावा लागतो, असतात बडोद्याला.

*डाॅक्टर सांगताहेत आपल्या मित्राला - -*

  मित्रा! २१ डिसेंबर रोजी एक कपल बडोद्याला  माझ्या रूग्णालयात आले, बरोबर ६ वर्षाची एक छोटी मुलगी. केस पेपर तयार होताच माझ्या डाॅक्टरनी छोट्या मुलीला तपासलं. सर्व तपासण्या,चाचण्यांचे रिपोर्ट मी पाहताच मुलीच्या आई वडिलांना बोलावून त्यांना माझं मत सांगितले. *मुलीच्या हार्ट मध्ये*
*प्रॉब्लेम आहे*. ऑलरेडी आजार फार पुढच्या स्टेजला असल्याने तातडीने ऑपरेट करावं, अन्यथा जास्तीत जास्त ३ महिने. पण असल्या *ऑपरेशनमध्येही survival rate is only 30 %*. आई आणि बाबा दोघांचेही डोळे पाणावले.
 देवाला हात जोडून ती मला म्हणाली, डाॅक्टर आपण ऑपरेशन करा. मी मुलीला अ‍ॅडमिट करायला सांगून procedures पूर्ण करण्यास
सांगितले.
  दुसरेच दिवशी काही अत्यावश्यक चाचण्या,
आणि नंतर ६ दिवसांनी ऑपरेशन.
६ वर्षाची ती निरागस मुलगी म्हणाली
"डाॅ आजोबा! मला एक प्रश्न विचारायचाय. सर्वजण म्हणतात  माझी open heart surgery आहे". डाॅक्टर लगेचच उत्तरले "बेबी काळजी करू नको. तुला काहीच दुखणार नाही, मी छान औषधे देईन".
   *पण आजोबा मला म्हणायचेय तुम्ही माझं हृदय ओपन करणार? मग ऑपरेशन नंतर मला सांगाल का माझ्या हृदयातला देवबाप्पा कसा दिसत होता? मला रोज मम्मी अंगारा लावून सांगते की ईथे बाप्पा आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. ईवलंस बोट छातीवर डावीकडं टेकवत ती मला म्हणाली*.

  मित्रा तुला माहित आहे, *मी जराही भावना प्रधान नाही रोज किमान ८/९ हृदयांचे मीच ऑपरेशन करतो. रोज माझे हे हात शब्दशः रक्तानं भरलेले असतात*. पण मी गडबडलो. कसेबसे  म्हणालो ok sure. मनांत आलं -हे सुंदर शिल्प  १५ /२० मिनिटानी असेल नं ?
   ऑपरेशन सुरू झालं. हार्ट लंग मशीन ऑन झाले. त्याच्यावरचा ग्राफ खाली वर होऊ  लागला. पण १५ मिनिटाच सर्व संपलं. बी.पी. low होउ लागलं.पल्स कमी व्हयला लागल्या. हृदयात रक्तच येत नव्हते. सग्गळं संपलं.
 मला त्या बेबीचे शब्द आठवले. "डाॅ आजोबा! माझी मम्मी म्हणते, माझ्या हृदयात बाप्पा रहातो. तुम्ही सांगाल, तो कसा दिसतो ते?" माझे डोळे भरून आले, समोरचं काहीही  दिसेना. मी भावविवश झालो, *देवा !बेबी आणि तीची आई ह्यांच्या* *विश्वासाप्रमाणं खरच तू हृदयांत असशील तर,आता तूच कांही करू शकतोस* .
माझं स्किल, प्रयत्न सर्व संपून गेलेत. निग्रहाने मी ऑर्डर्स दिल्या .make machine off. Remove my spects, gloves.     सिस्टरनी माझा चष्मा काढला. भरलेले डोळे पुसले. पण बेबीचे प्रश्न उभेच होते समोर.
मनांत विचार आला -देवा खरच तू हिच्या हृदयात...

डाॅक्टरss  ! असिस्टंट डॉक्टर जवळपास किंचळला. *blood is  comming*
*doctor blood is coming* .हार्ट मशीन सुरू
करा. सिस्टर, माझे ग्लोव्हज् स्पेक्ट. संपूर्ण ऑ. थिएटर electrify झाले. पुढील ४.३० तास
operation सुरू होतं. आणि *ऑपरेशन successful* .चेहरे आनंदले. मी  खूष. पण मित्रा! आता मी वेगळ्या चिंतेत आहे. त्या
बेबीनं उद्या मला विचारलं, *डाॅ आजोबा! माझ्या हृदयातल्या बाप्पाला पाहिलत?*
 मी अश्रद्ध मी काय सांगू?
 मित्र म्हणाला
 डाॅक्टर तुम्ही तीला सांगा, *बेबी, देव अग बघायचा नसतो*, *तो अनुभवायचा असतो*.

डाॅ. मेहतांच्या चेहर्‍यावर समाधान पसरल्याचं मला जाणवलं. पण त्यानंतर एक बदल झाल्याचं मला जाणवलं. डॉक्टर मेहतांच्या ऑ.
थिएटरमध्ये एक फोटो लावला गेलाय. असू दे *कोणतेही ऑपरेशन, डाॅक्टर फोटोसमोर मिनिटभर उभे रहातात, हात जोडून म्हणतात - परमेश्वरा मी लहान माणूस, माझं कौशल्य मी पणाला लावीनच पण तुझं लक्ष असू दे*.

 डाॅक्टर शैलेश मेहता म्हणतात *"बेबी मुळे मी सुसंस्कृत झालो*
मला पोस्ट आवडली म्हणून पोस्ट केली जास्ती जास्त लोकांपरेंत  पोहचवा 

दुधाचा होणारा फटका

दूध संघ शेतकऱ्याकडून खरेदी 17 रुपये,ग्राहकास विक्री 40 रुपये,23 रुपये मार्जिन,अन म्हणे आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी,
,"तुम्ही तर शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे दरोडेखोर"
ओरड काय तर सरकारच्या नावाने,खरेच तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी आसल तर 23 रुपये नफ्यातून 10 रुपये ध्या की शेतकऱ्याला,हे पैसे देण्यासाठी तुमचे हाथ कोणी बांधले काय, यात शेतकऱ्यांची पिळवणूक करून,सरकारला बदनाम करण्याची खेळी या दूध सम्राटांनी आखली आहे हे शेतकरी पुरते ओळखून आहे,तुमची नियातच घाण आहे,या दूध भावाच्या लुटीतून पुढच्या निवडणुकीसाठी पैसे जमा करण्याचा धंदा सुरू आहे


शेतकऱ्यांच्या दुधाचे संकलन केल्यावर पुढं काय होतं ते आपण पाहु.

यातली पहिली व्यवस्था संकलन केंद्र किंवा डेअरी आणि बल्क कुलर. इथं थेट दुध संकलन होतं. तिथुन ते चिलिंग प्लॅन्ट ला जातं.
इथवर येताना डेअरीचं कमिशन 1 रुपया, वाहतूक 80 पैसे प्रतिलिटर. चिलिंग प्लॅन्टचं कमिशन 50 पैसे.
म्हणजे इथवर येईस्तो एकूण खर्च झाला 2 रु 30 पैसे.

इथून पुढं दुध थेट प्रॉडक्शन प्लॅन्टला जातं. त्याची वाहतूक 80 पैसे धरून प्रतिलिटर खर्च झाला 3 रु 10 पैसे.

प्रॉडक्शन प्लॅन्ट मध्ये दुधातील फॅट्स काढल्या जातात. त्यापासुन श्रीखंड, आम्रखंड, पेढे, चीज, आईसक्रीम अशी प्रॉडक्ट बनवली जातात. दुधात पाणी मिसळून दुध थंड करून त्याच्या फॅट्स 3.0 पर्यंत आणल्या जातात व ते पिशवीत पॅक केलं जातं.

दुधाची पिशवी साधारण 45 रु लिटर गाय व 55 रु लिटर म्हैस अशा दराने विकली जाते. उपरोक्त दुग्धजन्य पदार्थ ही चढ्या भावाने विकले जातात. या पदार्थांचे कमीत कमी 20 रु पकडले तर एक लिटर दुधापासुन दुधसंघांना 65 रु गाय व 75 रु म्हैस मिळतात.

आता गायीचं दुध खरेदी केलं जातं प्रतिलिटर 17 रु दराने व म्हैस प्रतिलिटर 29 रु दराने. वर आपण काढलेला खर्च 3 रु 10 पैसे त्यात मिळवा. म्हणजे 20 रु 10 पैसे गाय व 32 रु 10 पैसे म्हैस.

दुधसंघाचा फायदा झाला गाय 65 - 20.10 = 44 रु 90 पैसे
व म्हैस 75 - 32.10 = 42 रु 10 पैसे.

याशिवाय सरकारकडून मिळणारी अनुदाने, सवलती वेगळ्याच.
या विवेचनावरून 'दुध नक्की कुठं मुरतयं' हे सर्वांच्या लक्षात येईलच. यावर अधिक टिप्पणीची गरजच नाही. शेतकऱ्यांच्या तोंडावर नाममात्र रक्कम फेकून सगळा मलिदा हडप करणाऱ्या दुधसंघ धारक चोरांना शेतकर्यानी आधी रिंगणात घ्यायला हवं.मग सरकार च्या नावाने बोंब मारली पाहिजे

देशी गायची माहिती


🚩🚩भारतीय देशी गाय  व  विदेशी जर्सी काऊ मधील फरक🚩🚩

गाय 

    🔸  मुळामध्ये  cow  ह्या  इंग्रजी  नावाने फार मोठा वैचारीक गोंधळ सर्वांचा करुन ठेवलेला आहे. युरोपमधे दुध देणार्‍या  जर्सी ,होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांस इंग्रज लोक cow  म्हणत.भारतात आल्यावर त्यांना त्यांच्या काऊ सारखी थोडीफार  दिसणारी  चार पायांची  दूध देणारी भारतीय गाय दिसली.म्हणुन त्यानी आपल्या देशी गायीलाही"  काऊ " असे संबोधले.तत्कालीन आपल्या विद्वान भाषांतर करणार्‍याने  "cow चे मराठीत गाय "असे भाषांतर केले.तिथुन पुढे वैचारीक गोंधळाला सुरुवात झाली.आपण लहान पणापासुन काऊ ला मराठीत गाय म्हणतात असेच शिकत आलो आहे .त्यामुळे या दोंहोतील फरक लक्षात येत नाही.

    🔸  गायींचे मुळ स्थान भारत देश आहे.गायीला प्राचीन काळापासुन संस्कृतमध्ये   गौ हिंदीमधे   गैया  तर मराठीत  गाय   असे आपल्या देशात संबोधले जाते.प्राचीन काळी आपला इंग्रजांशी काही संबंध नसल्यामुळे गायीला इंग्रजी नाव देण्याचा प्रश्न कधी उद्भवला नव्हता.


Image result for cow photo




  🔸   बाह्य अंगाने  morphologically पाहीले असता  विदेशी काऊ --  जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन  आणी भारतीय देशी गाय
यांच्यामधे प्रचंड फरक आहे.

 🔸देशी गायीला वशींड hump असते तर विदेशीला वशींड नसते.देशी गायीच्या वशींडामधे सुर्यकेतु नावाची नाडी असते. या नाडीच्या सहायाने ती सुर्यापासुन येणारी सुर्यतत्वे  स्वर्णक्षार  शोषून घेते.त्यामुळे देशी गायीच्या दूधात  तुपात व गोमुत्रात सुर्यतत्वाचे प्रमाण अधिक असुन ते औषधी असते.देशी गायीचे गोमुत्र जगातील महान औषधी मानले जाते ,गोमुत्राच्या कॅन्सरवरील प्रभावी औषधी उपयोगामुळे त्यास अमेरिकेचे  पेटंट मिळाले आहे(क्र.6410056).कासवापासुन ते हत्तीपर्यंत फक्त आणी फक्त भारतीय देशी गायीच्या पाठीला वशींड असते.

🔸देशी गायीचा चेहरा ज्याप्रमाणे  आई आपल्या मुलाकडे प्रेमाने पाहते तसा स्नेहमयी  प्रेमळ असतो.तर विदेशी जर्सीचा चेहरा भेसुर भयानक असतो.

🔸देशी गायीच्या शरीराची कधीच दुर्गंधी येत नाही. देशी गायीच्या शरीरातुन आयुर्वेदिकदृष्ट्या गुग्गुळाचा सुगंध येतो असे म्हटले जाते.तर विदेशी जर्सीच्या शरिराचा अतिशय घाणेरडा वास येतो  यांच्या गोठ्याच्या लांबुनच हा घाणेरडा वास अनुभवास येतो.

🔸देशी गायीचे शरीर आटोपशीर असते  तर विदेशीचे शरीर  ओबडधोबड असते.

🔸 देशी गाय झोपताना देखील आटोपशीर झोपते.कधीही भेसुरपध्द्तीने पाय वर करुन झोपत नाही.विदेशी जर्सी मात्र डुकराप्रमाणे  पायाला तणावा देउन झोपते.

  🔸देशी गायीचे हंबरणे व विदेशी जर्सीचे हंबरणे यात मोठा फरक आहे.देशी वासरु हंबरताना त्यातुन" मा "असा ध्वनी प्रतीत होतो.

🔸विदेशी जर्सीच्या शिळ्या दुधाचा व  शेणाचा मशाळ fishy असा  घाणेरडा वास येतो.

 🔸कोणत्याही जिज्ञासु व्यक्तीने  5 मिनिटे  देशी गाय व विदेशी जर्सी समोर ठेऊन निरिक्षण केले असता त्यास फार मोठा फरक जाणवेल. विदेशी जर्सी हा प्राणी डुकरापासुन जेनेटिक इंजीनिअरींगने बनविला असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे. डुक्कर एका वेळेस 10 ते 12  पिलांना जन्म देते. इतक्या मोठ्या संख्येने  पिलांना सांभाळणार्या डुकराची दुध उत्पादन क्षमता भरपुर असते.ते जीनस जर्सीमधे टाकल्याचा दावा केला जातो.

🔸भारतीय देशी गाय व  विदेशी जर्सी  यामधील शास्त्रीय फरक

🔸देशी गायीला Bos indicus  हे शास्रीय नाव आहे. तर विदेशी जर्सीला Bos taurus हे शास्रीय नाव आहे.या  Bos जीनस मधे 6प्रकारचे  वेगवेगळे  प्राणी आहेत .
1.Bos  indicus    भारतीय देशी गाय
2.Bos  gaurus      गवा
3.Bos  frontalis   मिथुन
4.Bos  mutus        याक
5.Bos javanicus   बेनटेंग
6.Bos taurus        विदेशी  जर्सी  ,होल्स्टेन फ्रीजीयन  इ. गायसदृश प्राणी .

   🔸वर दर्शविण्यात आलेले  सर्व सहा प्रकारचे प्राणी त्यांच्या स्पेसिज वेगवेगळ्या असल्यामुळे एकमेकापासुन वेगळे आहेत.जर आपले शास्त्रज्ञ जर्सीला गाय म्हणत असतील तर त्यानी याक  मिथुन  बेंटेंग   यांना देखील गाय म्हणावे  अन्यथा  ते  सर्व वेगवेगळे प्राणी आहेत हे तरी मान्य करावे म्हणजे शेतकरयांची होणारी फसवणुक टळू शकेल.आज कित्येक शेतकरी  हा फरक न समजल्यामुळे खरया देशी गायीएवजी जर्सीसारखे रोगकारक प्राणी  गाय समजुन पाळत आहेत, त्यांचे विषारी मुत्र गोमुत्र समजुन पित आहेत,देशी गायीचा जर्सी बरोबर संकर करुन  अनावधानाने  देशीगायीच्या वंशाची हत्या करण्याच्या पातकामधे सहभागी होत आहेत.कित्येक मठ मंदिरांमधे फरक न समजल्यामुळे देशी गायी ऐवजी जर्सी पाळली जात आहे.जो फरक  वांगे व बटाटे  ,  घोडा  व  गाढव  , मांजर व  वाघ यामधे आहे  तोच फरक वरिल सहा प्रकारच्या प्राण्यांमधे आहे.

🔸Solanum  melongena    वांगे
🔸Solanum  tuberosum  बटाटा.

    🔸जर उद्या एखादा उपटसुंभ शास्त्रज्ञ वांगे व बटाटा यांचा जिनस् एक आहे  म्हणून  ती दोनही  एकच  आहे असे समजुन संशोधन करु लागला तर गोंधळ उडुन जी  शेतकरयाची  समाजाची व राष्ट्राची हानी होइल नेमकी तीच हानी  भारतीय देशी गायी व  विदेशी जर्सी सारखे प्राणी  यांना एकच समजुन  गेल्या 40 वर्षात कृषी संशोधकानी जे  संकरीकरण घडवून आणले त्यामुळे झाली. अशा मुर्खपणामुळे अखंड भारत देशातील देशी गोवंश नाश पावून नामशेष होण्याच्या मार्गावर आला.एकेकाळी देशी गायीच्या दुधाने समृध्द असणारया देशात आता देशी गायीचे  आयुर्वेदिक दुध औषधालाही मिळणे  दुरापास्त झाले.जर्सीच्या दुधाने मधुमेह  ह्रदयरोग   कॅन्सर   या रोगांचे प्रचंड प्रमाण वाढले.

धक्कादायक बाब म्हणजे  गेल्या  आठ दशकात  ब्राझील , अमेरिका ,ऑस्ट्रेलिया ,मलेशिया या देशांनी भारतातुन देशी गायी नेउन त्यांचे शुद्ध रुपात उत्तम संवर्धन केले आहे.ब्राझीलमधे 60  लाख भारतीय गीर गायी आहेत. ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी गीर गायीची  शुध्द रुपात उत्तम जोपासना करुन दिवसाला 64 लिटर इतके दूध उत्पादन साध्य केले आहे. ब्राझीलच्या एकुण दुध उत्पादनामधे भारतीय गीर गायीचा  80%  वाटा असुन देशाची अर्थव्यवस्था भारतीय गायींच्या आधाराने उभी केली आहे.ब्राझील जागतिक बाजारात  भारतीय गायी ब्राझीलीयन कॅटल नावाने विकत आहे.

     त्यामुळे संकरीकरणावर बंदी आणून भारतीय देशी गाय वाचवणे काळाची गरज आहे.नाहीतर निसर्गाचा  हा अनमोल  ठेवा आपण कायमस्वरुपी गमावून बसू.
..........................................देशी गाय वाचवा  देश वाचवा.
🙏🙏🙏

मिसेस कोणाला म्हणतात.माहित आहे

मिसेस कोणाला म्हणतात.माहित आहे ? युरोपीय देशात पती पत्नी आयुष्यभर कधीच एकत्र राहू शकत नाही, ही ब्रिटीशांची हजारो वर्षांची परंपरा आहे. घटस्फोट जणुकाही करायचेच असतात.  *धर्मपत्नीला सोडून ज्या स्त्रियांशी संबंध येतात, तिला मिसेस म्हणतात.*
आणि *आपला नवरा सोडून ज्याच्याशी संबंध येतात, त्याला मिस्टर म्हणतात.* आपल्या संस्कृतीमधे किती सुंदर शब्द वापरलाय, श्रीमती.!
श्रीमती- श्री म्हणजे लक्ष्मी, मती म्हणजे बुद्धी. म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती जिच्यामधे एकत्र असतात, ती श्रीमती. आमची संस्कृती सोडून आम्ही आपल्या धर्मपत्नीची ओळख माझी मिसेस म्हणून करून द्यायला सुरवात केली. मानसिक गुलामी एवढी जास्त की, शब्दापेक्षा, अर्थापेक्षा इंग्रजीत ओळख करून द्यायची हौस जास्ती. अर्थ माहित नाही, म्हणून लाजही वाटत नाही. पण ज्याला अर्थ माहित आहेत, त्या विद्वानाने काय अर्थ काढायचे ?

युरोपमधे मॅडम कोणाला म्हणतात ?  *वेश्यागृहाना संचालीत करणारी जी मुख्य बाई असते, तिला मॅडम म्हणण्याची पद्धत आहे.*
भारतात कोणाला मॅडम म्हणतात ? *आम्ही आमच्या शिक्षिकांना मॅडम म्हणतो, अनोळखी स्रियांना हाक मारताना मॅडम म्हणतो. एवढेच नाहीतर कधीतरी आपल्या बहिणीला, आत्तेला, मावशीला पण आदराने मॅडम म्हणतो.* शिवीसारखा असलेला शब्द या गुलामगिरी मुळे आदरामधे बदलला गेला.
किती अर्थाचे अनर्थ होतात, पण लक्षात घेत कोण ?

आम्ही दूरध्वनी वरील संभाषणाची सुरुवात हॅलो या शब्दाने करतो. शब्दांचा अर्थ माहित नसतानाही केवळ इंग्रजी बोलण्याच्या प्रतिष्ठेसाठी केलेल्या गुलामगिरीचे हे आणखी एक उदाहरण..!! दूरध्वनी यंत्राचा शोध ज्याने लावला त्या ग्राहम बेलने हे यंत्र सुरु होताच पहिला फोन आपल्या प्रेयसीला लावला. तिने फोन उचलताच त्याने तिला हाक मारली .."हॅलो !!"
*हॅलो हे ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव होते. आम्ही मात्र कुणालाही फोन लावला तरी सुरुवात ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव घेवून करतो.* आहे की नाही अज्ञानातील गुलामगिरी....!!

अॅकॅडमीचे आकादमी हे रुपांतरही असाच आमचा मूर्खपणा आहे. अॅकॅडमस नावाच्या व्यक्तीच्या अंगणात प्लुटोची व्याख्याने होत होती. हे ज्ञानसत्र अॅकॅडमसच्या अंगणात चालते म्हणून ती अॅकॅडमी....!!
आम्ही त्याचे रुपांतर केले अकादमी ...!!
खर तर आपण प्रबोधिनी किंवा प्रबोधिका म्हणणे अधिक अर्थपूर्ण आहे. पण आम्हाला लाज वाटते अशी नावे द्यायची. *विकृत चालेल पण संस्कृत नको, ही आणखी एक मानसिक गुलामगिरी ....!!*

*पाश्चिमात्य देशात घटस्फोट झाले की मुलांना कुणी सांभाळायचे असा प्रश्न आहे. तिथं अशा मुलांसाठी ज्या संस्था आहेत त्यांना कॉन्व्हेंट म्हणतात. आम्ही इंग्रजी शाळात मुलांना घातलय हे अभिमानाने सांगण्यासाठी माझ मूल कॉन्व्हेंट मध्ये आहे हे कॉलर ताठ करुन सांगतो....!!*  लाजीरवाण्या गुलामगिरीचे हे उदाहरण ....!!!

असे खूप शब्द आहेत. ज्यांचे अर्थ माहित नाहीत पण आपण ते वापरतो. कारण काय तर मातृभाषेची लाज वाटते आणि इंग्रजीत प्रगती वाटते.

काही महत्वाच्या SITE

कोपीराईट फ्री IMAGES pexels.com/ ALL HEALTH RELATED DATAILS दुनिया च्या महाग वस्तु luxhabitat.ae KNOWLAGE SITE hindigyanbook.com/ BIOGR...