Tuesday, May 14, 2019

दुधाचा होणारा फटका

दूध संघ शेतकऱ्याकडून खरेदी 17 रुपये,ग्राहकास विक्री 40 रुपये,23 रुपये मार्जिन,अन म्हणे आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी,
,"तुम्ही तर शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे दरोडेखोर"
ओरड काय तर सरकारच्या नावाने,खरेच तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी आसल तर 23 रुपये नफ्यातून 10 रुपये ध्या की शेतकऱ्याला,हे पैसे देण्यासाठी तुमचे हाथ कोणी बांधले काय, यात शेतकऱ्यांची पिळवणूक करून,सरकारला बदनाम करण्याची खेळी या दूध सम्राटांनी आखली आहे हे शेतकरी पुरते ओळखून आहे,तुमची नियातच घाण आहे,या दूध भावाच्या लुटीतून पुढच्या निवडणुकीसाठी पैसे जमा करण्याचा धंदा सुरू आहे


शेतकऱ्यांच्या दुधाचे संकलन केल्यावर पुढं काय होतं ते आपण पाहु.

यातली पहिली व्यवस्था संकलन केंद्र किंवा डेअरी आणि बल्क कुलर. इथं थेट दुध संकलन होतं. तिथुन ते चिलिंग प्लॅन्ट ला जातं.
इथवर येताना डेअरीचं कमिशन 1 रुपया, वाहतूक 80 पैसे प्रतिलिटर. चिलिंग प्लॅन्टचं कमिशन 50 पैसे.
म्हणजे इथवर येईस्तो एकूण खर्च झाला 2 रु 30 पैसे.

इथून पुढं दुध थेट प्रॉडक्शन प्लॅन्टला जातं. त्याची वाहतूक 80 पैसे धरून प्रतिलिटर खर्च झाला 3 रु 10 पैसे.

प्रॉडक्शन प्लॅन्ट मध्ये दुधातील फॅट्स काढल्या जातात. त्यापासुन श्रीखंड, आम्रखंड, पेढे, चीज, आईसक्रीम अशी प्रॉडक्ट बनवली जातात. दुधात पाणी मिसळून दुध थंड करून त्याच्या फॅट्स 3.0 पर्यंत आणल्या जातात व ते पिशवीत पॅक केलं जातं.

दुधाची पिशवी साधारण 45 रु लिटर गाय व 55 रु लिटर म्हैस अशा दराने विकली जाते. उपरोक्त दुग्धजन्य पदार्थ ही चढ्या भावाने विकले जातात. या पदार्थांचे कमीत कमी 20 रु पकडले तर एक लिटर दुधापासुन दुधसंघांना 65 रु गाय व 75 रु म्हैस मिळतात.

आता गायीचं दुध खरेदी केलं जातं प्रतिलिटर 17 रु दराने व म्हैस प्रतिलिटर 29 रु दराने. वर आपण काढलेला खर्च 3 रु 10 पैसे त्यात मिळवा. म्हणजे 20 रु 10 पैसे गाय व 32 रु 10 पैसे म्हैस.

दुधसंघाचा फायदा झाला गाय 65 - 20.10 = 44 रु 90 पैसे
व म्हैस 75 - 32.10 = 42 रु 10 पैसे.

याशिवाय सरकारकडून मिळणारी अनुदाने, सवलती वेगळ्याच.
या विवेचनावरून 'दुध नक्की कुठं मुरतयं' हे सर्वांच्या लक्षात येईलच. यावर अधिक टिप्पणीची गरजच नाही. शेतकऱ्यांच्या तोंडावर नाममात्र रक्कम फेकून सगळा मलिदा हडप करणाऱ्या दुधसंघ धारक चोरांना शेतकर्यानी आधी रिंगणात घ्यायला हवं.मग सरकार च्या नावाने बोंब मारली पाहिजे

No comments:

Post a Comment

काही महत्वाच्या SITE

कोपीराईट फ्री IMAGES pexels.com/ ALL HEALTH RELATED DATAILS दुनिया च्या महाग वस्तु luxhabitat.ae KNOWLAGE SITE hindigyanbook.com/ BIOGR...