Tuesday, May 14, 2019

केवळ मोदी पुन्हा येऊ नयेत

                                                 
पाकिस्तान हा देश जन्माला आल्यापासून आजवर एकदाही भारताशी युद्धात जिंकू शकलेला नाही. हे त्यांनाही माहिती आहे. पण त्याचा जन्मच मुळी भारतद्वेषा पोटी झालेला असल्याने तो कुरापती काढणं कधीच थांबवणार नाही. पाकिस्तान तर्फे आलेले शांतता प्रस्ताव हे केवळ 'टाईम प्लीज' असतात, हा इतिहास आहे. त्यामुळे पुलवामात जे घडलं, ते पुन्हा कधीतरी, कुठेतरी घडवण्यासाठी पाक प्रयत्न करेलच, हे नक्की.
या आधी जेव्हा जेव्हा भारताला युध्दाला वा सदृश परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, तेव्हाचं आणि आताचं वातावरण खूप वेगळं आहे. तेव्हा युद्धकाळात पंतप्रधान पदाचा मान विरोधीपक्षही ठेवत होता. बापट, कुसुमाग्रज, गदिमा यांसारखे कवि सैनिकांचे मनोबल वाढवणाऱ्या, नागरिकांना त्यांच्याशी जोडणाऱ्या कविता करत होते. मीडियाकडे तेव्हा आतासारखी राक्षसी ताकद नव्हती. घरभेदे, देशहितशत्रू तेव्हाही असतील; पण त्यांना फारसा आवाज नव्हता.. मान तर अजिबातच नव्हता.
आजच्या काळात दुर्दैवाने याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. आता बाहेरच्या शत्रूपेक्षा हे अस्तनीतले निखारे जास्त धोकादायक झालेत. अनेक कारणांनी मीडियाने त्यांना उचलून धरलंय. उघडपणे देशाविरोधात बोलूनही त्यांना मान मिळतोय. *'मोदी' या एका माणसाच्या द्वेषापायी ठार आंधळे झालेले हे नतद्रष्ट आपल्याच घराला कमकुवत करताहेत.* अगदी नावानिशी बघा - राज ठाकरे, आव्हाड, ओवेसी यांसारखे नेते; राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, प्रसन्न जोशी सारखे वाहिनीवाले; गिरीश कुबेर,संजय राऊत सारखे संपादक; मुग्धा कर्णिक, कोकाटे, विश्वंभर चौधरी सारखे लेखक... यांनी आपला मोदीद्वेष इतका पराकोटीला नेलाय की त्यांची मोदींना हरवण्यासाठी पाकिस्तानची तळी उचलायचीही तयारी आहे. यांच्या पोस्टस् बघा एकदा...
*पुलवामात ४४ जवान हुतात्मे झाले. याचं दु:ख होण्याऐवजी ही कर्णिकबाई बेशरमपणे मोदींना विचारते- " हाऊ ईज द जोश मोदीजीऽऽ?" आणि नंतर बालाकोट बदल्यानंतर हीच लिहिते- " देशाचे हवाईदल ही कोणा नटेन्द्राची किंवा त्याने पाळलेल्या श्वापदांची सेना नाही.." तो विश्वंभर चौधरी सांगतो.. 'घटना पुन्हा वाचली. सैन्यदलांचे प्रमुख राष्ट्रपती असतात. पंतप्रधान नव्हे!' हो ना ? मग " हाऊ ईज द जोश?" हा प्रश्नही राष्ट्रपतींना किंवा सैन्यप्रमुखांनाच विचारायचा होता. तेव्हा मोदीच कसे आठवतात?*
आज विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात अडकलेत. याचा तर या नतद्रष्ट कंपूला आनंद झालाय असं दिसतंय. कारण मोदींचं नाक कापलं जाईल ही आशा आहे ! म्हणजे ती जबाबदारी पुन्हा मोदींची! इथे विश्वंभर चौधरीने वाचलेली घटना काय म्हणते? आणि १९७१ च्या युद्धात मिळालेला विजय आजतागायत 'दुर्गा' इंदिरा गांधींच्या खात्यात जमा आहे. तेव्हा याची घटना कुठे जाते? भंपक लेकाचे ....
हा दुतोंडीपणा यांनी सोयीनुसार जोपासला आहे. तो 'ॲक्सिडेंटल' नाही. सामान्य नागरिकाचा बुद्धिभेद करणे हा त्यांचा मूळ उद्देश आहे. पाकिस्तानशी युद्ध होईल का? त्याचे परिणाम काय होतील? या प्रश्नांमधे या घरभेद्यांना अजिबात रस नाही. या घटनांचा मोदींना फायदा झाला तर काय करायचं, एवढीच चिंता त्यांना सतावतेय.
१९७१ मधे इंदिरा गांधींना मिळालेलं श्रेय अजूनही सुखाने उपभोगणारे काँग्रेसी बगलबच्चे आता खडबडून जागे झालेत. आता त्यांना साक्षात्कार होतोय की सैन्याच्या विजयात पंतप्रधानांचा काही संबंध नसतो.
इकडे काही निवृत्त वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं, की २६/११ च्या नरसंहारा नंतर, संसदेवरील हल्ल्यानंतर अशीच थेट कारवाई करण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. पण ती तेव्हाच्या पंतप्रधानांनी दिली नाही. (तेव्हा विश्वंभर बहुदा अज्ञात होते. म्हणून पंतप्रधांनाकडे संमती मागितली... घटना वाचत नाहीत सेनेचे अधिकारी!)
आज सामान्य माणूस उघडपणे या बदल्याचं श्रेय पंतप्रधानांना देतोय. ते बघून यांना मळमळायला लागलंय. एरव्ही आपणही हा विषय राजकारणा पलिकडेच ठेवला असता. पण आता नाही. केवळ मोदी पुन्हा येऊ नयेत म्हणून यांचा आटापिटा चाललाय ना? मग आता मोदीच पुन्हा आले पाहिजे... आपण आणू!
एखादा अभिनंदन अडकेल याचा विचार न करता हवाई हल्ला केल्याचे हे परिणाम आहेत, असं हे हरामखोर आता म्हणताहेत. आज एका सैनिकाच्या सुरक्षेचा इतका पुळका येतोय? मग वर्षानुवर्षे असे अनेक सैनिक इथे, काश्मीरमधे फुटिरतावाद्यांच्या दगडफेकीत जखमी होतात; त्यांची कधी काळजी वाटली नाही या नालायकांना?
*मोदी या विजयाचं राजकारण करताहेत? बरं करू देत. चालेल आम्हाला. ते निदान पाकड्यांना मारून, आपल्या सैन्याच्या पाठीशी राहून राजकारण करतात. तुम्ही तर मोदीद्वेषापोटी आपल्याच सैनिकांच्या शौर्याचे आणि हौतात्म्याचे पुरावे मागून पाकिस्तानपेक्षा गलिच्छ राजकारण करताय.*
तुमच्या नादी आम्ही लागू असं वाटतं तुम्हाला? अरे हाट्..... कधीच नाही!
हाऊ इज द जोश? .... इन् मेजॉरिटी, सर !

जय हिंद..

No comments:

Post a Comment

काही महत्वाच्या SITE

कोपीराईट फ्री IMAGES pexels.com/ ALL HEALTH RELATED DATAILS दुनिया च्या महाग वस्तु luxhabitat.ae KNOWLAGE SITE hindigyanbook.com/ BIOGR...