1) *रेशनची संकल्पना प्रथम कधी आली?* : भारतात अन्नधान्यावर नियंत्रण (रेशन) ही संकल्पना प्रथम 1939 मधे परिचित झाली.
तेव्हा दुसर्या महायुद्धास तोंड फुटलेले असल्यामुळे आवश्यक तेवढेच धान्य जनतेला देऊन उर्वरित धान्य सैनिकांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी रेशनवर धान्यवाटप हा प्रकार ब्रिटिशांनी सुरू केला. विशेष बाब म्हणजे आजही तो सुरूच आहे.
2) *जगातला सर्वाधिक भाग्यवान राजकारणी कोण?* : इंग्लंडचे थोर नेते विन्स्टन चर्चिल जगातले सर्वाधिक भाग्यवान राजकारणी समजले जातात.
वयाच्या 26 व्या वर्षीच ते संसदेवर निवडून आले. वयाच्या 32 व्या वर्षी मंत्री झाले. दोनदा पंतप्रधान झाले. थोडे अपवाद वगळता 1906 ते 1955 या सर्व काळात ते मंत्री होते. सत्तेवर राहणे शक्य असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी ते निवृत्त झाले.
No comments:
Post a Comment