Sunday, March 3, 2019

ड्रायव्हर बदल असलेला गैरसमज

                                                   “ड्रायव्हर बदल असलेला गैरसमज”

ड्रायव्हिंग हि कलाच खूप वेगळी आहे, सर्वांना न जमणारी हि एक कला आहे. काही लोक पैसे देऊन ड्रायव्हिंग शिकतात तर काही जन्मताच ड्रायव्हर असतात असे म्हंटल तरी चालेल...

ड्रायव्हरचे दोन प्रकार आहेत एक स्वताची गाडी चालवणारा ड्रायव्हर म्हणजेच गाडी मालक तर दुसर्याची गाडी चालवणारा ड्रायव्हर आणि शेवटी दोघही ड्रायवरच.

ड्रायव्हर हा पण आपल्या सारखा एक माणूस आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एक करता धरता व्यक्ती जो दिवस रात्र गाडी चालून मिळणारया पैसयातून आपल्या परिवाराचे पालन पोषण करणारा ड्रायव्हर.. ड्रायव्हर गाडी घेऊन निघाला कि तो परत घरी आला तरच खर..नाही तर काही खर नाही...

ड्रायव्हर कडून कुठला हि आपघात झाला कोणलाहि धक्का लागला कि, ड्रायव्हरचा गाडीवरच नियञंण सुटल असाव, तो दारु पिलेला होता, त्याला झोप लागली होती, त्याला पोलिसांच्या ताब्यात दया, अस आपण म्हणतात. सर्व चुका ड्रायव्हरच्याच असतात अस आपल्या संपूर्णपणे वाटत...

पण त्या ड्रायव्हरला तुम्ही कधी आपुलकीन विचारल कि तुझी झोप झाली का ? तू जेवण केलं का ? बर आता दिवसभर गाडी चालवली किंवा राञभर गाडी चालवली आता आराम कर तू काही लागल तर सांग अस कुणीहि विचारलय आता पर्यंत.

आपल्या कडे भारतात तर प्रथाच पडलीये कि ड्रायव्हर कडून कोणाला धक्का लागला किंव्हा धडक दिली तर आजूबाजू चे लोकं जमा होतात आणि पहिले ड्रायव्हर ला मारतात मग कितपत मारायचे ह्याचा भान देखील राहत नाही लोकांना नंतर गाडी फोडतात, अस का ? चुकी कोणाची आहे, अपघात कसा झाला, कोणाला लागले का, ड्रायव्हर ला काही झालेय का ? ह्या सर्व गोष्टी लक्षात न घेता आपण ड्रायव्हर ला मारतो. कायदेशीर खूप काही गोष्टी आहेत ज्या motor”मोटर वेहीकॅल कायद्या १९८८” अंतर्गत दोन्ही अपघात ग्रस्तांना न्याय दिला जातो व नुकसान भरपाई दिली जाते. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे,  पण पूर्वसूचनेशिवाय,ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा 'अपघात' या शब्दाचा सामान्य अर्थ होतो. अपघात झाल्यावर ड्रायव्हरची मनस्थिती खूप अवघड असते, कुठे तरी गाडी सोडून पळून जाने, मला लोक मारतील, मारता मारता ड्रायव्हरचा मृत्यू देखील होऊ शकतो, पळून जाता जाता अपघात हि होऊ शकतो. ड्रायव्हर पण कोणाचे तरी वडील असतात, पती असतात, त्याला हि परिवार असतो मग मारण्याचे नेमकी कारण काय ? परक्या गावात रस्त्यावर झालेल्या अपघाता नंतर ड्रायव्हर एकटा पडतो त्याचे त्या गावात परक्या ठिकाणी कोण्ही नसते मग आपले कर्तव्य आहे कि त्याला धीर देणे व सांभाळून घेणे न कि मारने.

कोणतीही गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला किंमत नाही तो म्हणजे फालतु ड्रायव्हर अश्या नजरेन आपण बघतो ? कुठे तरी समाजात राहत असतांना, आपण ड्रायव्हर हा हि आपला एक घटक आहे व त्याची हि बाजू आपण समजून घेतली पाहिजे हे समजले पाहिजे.

लक्षात असूद्या मित्रांनो ड्रायव्हरवर हात उचलण्यआधी थोडा विचार करा....हीच वेळ कोणावर कधी येईल सांगता येणार नाही ?

डॉक्टरांना मारले कि सर्व डॉक्टर एकत्र येतात स्वतंत्र कायद्याची मागणी करतात मग ड्रायव्हर साठी कोण आवाज उठवणार..का सर्व ड्रायव्हर एकत्र येत नाही ? का हक्का साठी लढत नाही ? कधी नष्ट होईल ड्रायव्हर लोकांना मारने..? श्रीमंत माणूस जेव्हा एका ड्रायव्हर ला मारतांना दिसतो तेव्हा लाज वाटते मला एक भारतीय नागरिक असल्याची....



No comments:

Post a Comment

काही महत्वाच्या SITE

कोपीराईट फ्री IMAGES pexels.com/ ALL HEALTH RELATED DATAILS दुनिया च्या महाग वस्तु luxhabitat.ae KNOWLAGE SITE hindigyanbook.com/ BIOGR...